भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवाचिये माथां घालुनियां भार । सांडीं कलेवर ओंवाळूनि ॥ ॥ नाथिला हा छंद अभिमान अंगीं । निमित्याचे वेगीं सारीं ओझें ॥ध्रु.

devachiye mathan ghaluniyan bhar | sandin kalevar onvaluni || || nathila ha chhand abhiman angin | nimityache vegin sarin ojhen ||dhru.

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देवाचिये माथां घालुनियां भार । सांडीं कलेवर ओंवाळूनि ॥ ॥ नाथिला हा छंद अभिमान अंगीं । निमित्याचे वेगीं सारीं ओझें ॥ध्रु.॥ करुणावचनीं लाहो एकसरें । नेदावें दुसरें आड येऊं ॥२॥ तुका म्हणे सांडीं लटिक्याचा संग । आनंद तो मग प्रगटेल ॥३॥