भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवाची ते खूण आला ज्याच्या घरा । त्याच्या पडे चिरा संसारासी

devachi te khun ala jyachya ghara | tyachya pade chira sansarasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देवाची ते खूण आला ज्याच्या घरा । त्याच्या पडे चिरा संसारासी ॥१॥ देवाची ते खूण करावें वाटोंळें । आपणा वेगळें कोणी नाहीं ॥ध्रु.॥ देवाची ते खूण गुंतों नेदी आशा । ममतेच्या पाशा शिवों नेदी ॥२॥ देवाची ते खून करावे तोंडाळ । आणिक सकळ जग हरी ॥३॥ देवाची ते खून झाला ज्यासी संग । त्याचा झाला भंग मनुष्यपणा ॥४॥ देवाची ते खूण गुंतों नेदी वाचा । लागों असत्याचा मळ नेदी ॥५॥ देवाची ते खूण तोडी मायाजाळ। आणि हें सकळ जग हरी ॥६॥ पहा देवें तेंचि बळकाविलें स्थळ। तुक्यापें सकळ चिन्हें होतीं ॥७॥