भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवाचि भंडारी । आदा विनियोग करी

devachi bhandari | ada viniyog kari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देवाचि भंडारी । आदा विनियोग करी ॥१॥ आतां न माखे हातपाय । नेणों होतें कैसे काय ॥ध्रु.॥ देवें नेली चिंता । झाला सकळ करिता ॥२॥ तुका म्हणे धनी । त्यासी अवघी पुरवणी ॥३॥