भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवाचें निर्माल्य कोण शिवे हातीं । संकल्पासी होती विकल्प ते

devachen nirmalya kon shive hatin | sankalpasi hoti vikalpa te

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देवाचें निर्माल्य कोण शिवे हातीं । संकल्पासी होती विकल्प ते ॥१॥ वाहिलें देह हें देवा एकसरें । होईल तें बरें तेणें द्वारें ॥ध्रु.॥ होता भार त्याची निवारली खंती । येथें आतां रिती सांठवण ॥२॥ तुका म्हणे इच्छे पावविले कष्ट । म्हणऊनि नष्ट दुरावली ॥३॥