भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवाचें चरित्र नाठवे सर्वथा । विनोदार्थ कथा गोड वाटे

devachen charitra nathave sarvatha | vinodartha katha god vate

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देवाचें चरित्र नाठवे सर्वथा । विनोदार्थ कथा गोड वाटे ॥१॥ हातावरी हात हासोनि आफळी । वाजवितां टाळी लाज वाटे ॥२॥ तुका म्हणे थुंका त्याच्या तोंडावरी । जातो यमपुरी भोगावया ॥३॥