भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवाचे म्हणोनि देवीं अनादर । हें मोठें आश्चर्य वाटतसे

devache mhanoni devin anadar | hen mothen ashcharya vatatase

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देवाचे म्हणोनि देवीं अनादर । हें मोठें आश्चर्य वाटतसे ॥१॥ आतां येरा जना म्हणावें तें काई । जया भार डोई संसाराचा ॥ध्रु.॥ त्यजुनी संसार अभिमान सांडा । जुलूम हा मोठा दिसतसे ॥२॥ तुका म्हणे अळस करूनियां साहे । बळें कैसे पाहें वांयां जातो ॥३॥