भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवाचे घरीं देवें केले चोरी । देवें देव नागवूनि केला भिकारी

devache gharin deven kele chori | deven dev nagavuni kela bhikari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देवाचे घरीं देवें केले चोरी । देवें देव नागवूनि केला भिकारी ॥१॥ धांवणियां धांवा धांवणियां धांवा । माग चि नाहीं जावें कवणिया गांवा ॥ध्रु.॥ सवें चि होता चोर घरिचिया घरीं । अवघें वाटोळें फावलियावरी केलें ॥२॥ तुका म्हणे येथें कोणी च नाहीं । नागवलें कोण गेलें कोणाचें काई ॥३॥