भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवाचे भजन कां रे न करीसी तैसे । अखडं हव्यासे पीडतोसी

devache bhajan kan re na karisi taise | akhadan havyase pidatosi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देवाचे भजन कां रे न करीसी तैसे । अखडं हव्यासे पीडतोसी ॥१॥ देवासी शरण कां रे नवजासी तैसा । बक मीना जैसा मनुष्यालागी ॥ध्रु॥ देवाचा विश्वास कां रे नाही तैसा । पुत्रस्नेहे जैसा गुंतलासी ॥२॥ कां रे नाही तैसी देवाची ते गोडी । नागवूनी सोडी पत्नी तैसी ॥३॥ कां रे नाही तैसे देवाचे उपकार । माया मथ्या भार पितृपूजना ॥४॥ कां रे भय वाहासी लोकांचा धाक । विसरुनीयां एक नारायण ॥५॥ तुका म्हणे कां रे घातले हे वायां । अवघे आयुष्य जाया भक्तिविण ॥६॥