भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव वसे चित्तीं । त्याची घडावी संगती

dev vase chittin | tyachi ghadavi sangati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देव वसे चित्तीं । त्याची घडावी संगती ॥१॥ ऐसें आवडतें मना । देवा पुरवावी वासना ॥ध्रु.॥ हरीजनासी भेटी । नहो अंगसंगें तुटी ॥२॥ तुका म्हणे जिणें । भलें संतसंघष्टणें ॥३॥