भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव त्यां फावला भाविका गोपाळां । नाहीं तेथें कळा अभिमान

dev tyan phavala bhavika gopalan | nahin tethen kala abhiman

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देव त्यां फावला भाविका गोपाळां । नाहीं तेथें कळा अभिमान ॥१॥ नाडलीं आपल्या आपण चि एकें । संदेहदायकें बहुफार ॥२॥ फार चाळविलीं नेदी कळों माव । देवाआदिदेव विश्वंभर ॥३॥ विश्वासावांचुनि कळों नये खरा । अभक्तां अधीरा जैसा तैसा ॥४॥ जैसा भाव तैसा जवळि त्या दुरि । तुका म्हणे हरी देतो घेतो ॥५॥