भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव तीर्थ येर दिसे जया ओस । तोचि तया दोष जाणतिया

dev tirtha yer dise jaya os | tochi taya dosh janatiya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देव तीर्थ येर दिसे जया ओस । तोचि तया दोष जाणतिया ॥१॥ तया बरें फावे देवा चुकवितां । संचिलाची सत्ता अंतराय ॥ध्रु.॥ शुद्धाशुद्धठाव पापुण्यबीज । पाववील दुजे फळभोग ॥२॥ तुका म्हणे विश्वंभराऐसें वर्म । चुकविल्या धर्म अवघे मिथ्या ॥३॥