भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव तिंहीं बळें धरिला सायासें । करूनियां नास उपाधीचा

dev tinhin balen dharila sayasen | karuniyan nas upadhicha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देव तिंहीं बळें धरिला सायासें । करूनियां नास उपाधीचा ॥१॥ पर्वपक्षी धातु धिक्कारिलें जन । स्वयें जनार्दन ते चि झाले ॥२॥ तुका म्हणे यासी न चले तांतडी । अनुभवें गोडी येईल कळों ॥३॥