भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव ते संत देव ते संत । निमित्य त्या प्रतिमा

dev te sant dev te sant | nimitya tya pratima

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देव ते संत देव ते संत । निमित्य त्या प्रतिमा ॥१॥ मी तों सांगतसें भावें । असो ठावें सकळां ॥ध्रु.॥ निराकारी ओस दिशा । येथें इच्छा पुरतसे ॥२॥ तुका म्हणे रोकडें केणें । सेवितां येणें पोट धाय ॥३॥