भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव राखे तया मारील कोण । न मोडे कांटा हिंडतां वन

dev rakhe taya maril kon | na mode kanta hindatan van

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देव राखे तया मारील कोण । न मोडे कांटा हिंडतां वन ॥१॥ न जळे न बुडे नव्हे कांहीं । विष तें ही अमृत पाहीं ॥ध्रु.॥ न चुके वाट न पडे फंदीं । नव्हे कधीं कधीं यमबाधा ॥२॥ तुका म्हणे नारायण । येतां गोळ्या वारी बाण ॥३॥