भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव पाहावया करी वो सायास । न धरी हे आस नाशिवंत

dev pahavaya kari vo sayas | na dhari he as nashivant

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देव पाहावया करी वो सायास । न धरी हे आस नाशिवंत ॥१॥ दिन शुध्द सोम सकाळी पातला । द्वादशी घडला पर्वकाळ ॥ध्रु.॥ द्विजां पाचारुनी शुद्ध करी मन । देई वो हे दान यथाविधी ॥२॥ नको चिंता करुं वस्त्रा या पोटाची । माउली आमुची पांडुरंग ॥३॥ तुका म्हणे दुरी सांगतो पाल्हाळी । परी तो जवळी आहे आम्हां ॥४॥