भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव होईजेत देवाचे संगती । पतन पंगती जगाचिया

dev hoijet devache sangati | patan pangati jagachiya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देव होईजेत देवाचे संगती । पतन पंगती जगाचिया ॥१॥ दोहींकडे दोन्ही वाहातील वाटा । करितील सांटा आपुलाला ॥ध्रु.॥ दाखविले परी नाहीं वरीजितां । आला तो तोचित्ता भाग वरी ॥२॥ तुका म्हणे अंगीं आवडीचें बळ । उपदेश मूळबीजमात्र ॥३॥