भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव घ्या कोणी देव घ्या कोणी । आइता आला घर पुसोनी

dev ghya koni dev ghya koni | aita ala ghar pusoni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देव घ्या कोणी देव घ्या कोणी । आइता आला घर पुसोनी ॥१॥ देव न लगे देव न लगे । सांठवणाचे रुधले जागे ॥ध्रु.॥ देव मंदला देव मंदला । भाव बुडाला काय करूं ॥२॥ देव घ्या फुका देव घ्या फुका । न लगे रुका मोल कांहीं ॥३॥ दुबळा तुका भावेंविणें । उधारा देव घेतला रुणें ॥४॥