भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव भला देव भला । मिळोनि जाय जैसा त्याला

dev bhala dev bhala | miloni jay jaisa tyala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देव भला देव भला । मिळोनि जाय जैसा त्याला ॥१॥ देव उदार उदार । देतां नाहीं थोडें फार ॥ध्रु.॥ देव बळी देव बळी । जोडा नाहीं भूमंडळीं ॥२॥ देव व्हावा देव व्हावा । आवडे तो सर्वां जीवां ॥३॥ देव चांगला चांगला । तुका चरणीं लागला ॥४॥