भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव भक्तालागीं करूं नेदी संसार । अंगें वारावार करोनि ठेवी

dev bhaktalagin karun nedi sansar | angen varavar karoni thevi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देव भक्तालागीं करूं नेदी संसार । अंगें वारावार करोनि ठेवी ॥१॥ भाग्य द्यावें तरी अंगीं भरे ताठा । म्हणोनि करंटा करोनि ठेवी ॥ध्रु.॥ स्त्री द्यावी गुणवंती तिपे गुंते आशा । यालागीं कर्कशा करुनी ठेवी॥२॥ तुका म्हणे साक्ष मज आली देखा । आणीक या लोकां काय सांगों ॥३॥