भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव आहे सुकाळ देशीं । अभाग्यासी दुर्भीक्ष

dev ahe sukal deshin | abhagyasi durbhiksha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देव आहे सुकाळ देशीं । अभाग्यासी दुर्भीक्ष ॥१॥ नेणती हा करूं सांटा । भरले फाटा आडरानें ॥ध्रु.॥ वसवूनि असे घर । माग दूर घातला ॥२॥ तुका म्हणे मन मुरे । मग जें उरे तें चि तूं ॥३॥