भजनी मालिका
← भजनांकडे परत

देऊनियां भेटी मजसी न करी गोठी

deuniyan bheti majasi na kari gothi

देऊनियां भेटी मजसी न करी गोठी । लांचावला जीउ पाठी न राहेवो । निष्ठुर म्हणो तरी अपंगीतो मातें । व्यापूनि जीवातें उरी उरवितो ॥१॥ तो दाखवावो माये धरिन त्याचे पाये । तयालागीं जीऊ आहे उतावेळु ॥२॥ भेटीचेनि सुखें मनचि होय मुर्के । तें रुप देखें परि बोलावेना ॥ सगुण गुणाचा म्हणोनि घातली मिठी । तंव तो आपणया समसाठीं करुनि ठेलें ॥३॥ काय नेणों कामाण कैसें वो जालें । चित्त चोरुनि नेलें गोवळेनें । बापरखुमादेविवरु विठ्ठले अंग लपवूनि । चैतन्य चोरुनि नेणों माये ॥४॥