भजनी मालिका
← भजनांकडे परत

देखोनि पुजावया गेलें द्वैतभावें

dekhoni pujavaya gelen dvaitabhaven

देखोनि पुजावया गेलें द्वैतभावें । तेथें एक उपदेशी श्रीगुरुरावो ॥१॥ द्वैतभावो नाशिला माझा द्वैतभावो नाशिला । पूजा उध्दंस केला तें ब्रह्ममय ॥२॥ रखुमादेविवरु देखण्या वेगळा देखिला । सगुण निर्गुण जाला बाईये वो ॥३॥