भजनी मालिका
← भजनांकडे परत

देखिला देखिला योगियांचा रावो । रुक्मादेवीनाहो पंढरीचा

dekhila dekhila yogiyancha ravo | rukmadevinaho pandharicha

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
देखिला देखिला योगियांचा रावो । रुक्मादेवीनाहो पंढरीचा ॥१॥ पुंडलिकासाठीं युगें अठ्ठावीस । धरोनी बाळवेष भीमातटीं ॥२॥ गाई गोपाळ वत्सें वैष्णवांचा मेळा । नाचत गोपाळ विठ्ठल छंदें ॥३॥ चोखामेळा तेथें वंदितो चरण । घाली लोटांगण महाद्वारी ॥४॥