भजनी मालिका
← भजनांकडे परत

देहभाव आम्ही राहिलों ठेवूनि । निवांत चरणीं विठोबाच्या

dehabhav amhi rahilon thevuni | nivant charanin vithobachya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देहभाव आम्ही राहिलों ठेवूनि । निवांत चरणीं विठोबाच्या ॥१॥ आमुच्या हिताचा जाणोनि उपाव । तोचि पुढें देव करीतसे ॥ध्रु.॥ म्हणउनी नाहीं सुख दुःख मनीं । ऐकिलिया कानीं वचनाचें ॥२॥ जालों मी निःसंग निवांत एकला । भार त्या विठ्ठला घालूनियां ॥३॥ तुका म्हणे जालों जयाचा अंकित । तोचि माझें हित सर्व जाणे ॥४॥