भजनी मालिका
← भजनांकडे परत

दया तिचें नांव भूतांचें पाळण । अणीक निर्दळण कंटकांचें

daya tichen nanv bhutanchen palan | anik nirdalan kantakanchen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दया तिचें नांव भूतांचें पाळण । अणीक निर्दळण कंटकांचें ॥१॥ धर्म नीतीचा हा ऐकावा वेव्हार । निवडिले सार असार तें ॥ध्रु.॥ पाप त्याचें नांव न विचारितां नीत । भलतें चि उन्मत्त करी सदा ॥२॥ तुका म्हणे धर्म रक्षावया साठीं । देवास ही आटी जन्म घेणें ॥३॥