भजनी मालिका
← भजनांकडे परत

दाटे कंठ लागे डोळियां पाझर । गुणाची अपार वृष्टि वरी

date kanth lage doliyan pajhar | gunachi apar vrushti vari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दाटे कंठ लागे डोळियां पाझर । गुणाची अपार वृष्टि वरी ॥१॥ तेणें सुखें छंदें घेईन सोंहळा । होऊनि निराळा पापपुण्यां॥ध्रु.॥ तुझ्या मोहें पडो मागील विसर । आलापें सुस्वर करिन कंठ ॥२॥ तुका म्हणे येथें पाहिजे सौरस । तुम्हांविण रस गोड नव्हे॥३॥