भजनी मालिका
← भजनांकडे परत

दाता नारायण । स्वयें भोगिता आपण

data narayan | svayen bhogita apan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दाता नारायण । स्वयें भोगिता आपण ॥१॥ आतां काय उरलें वाचे । पुढें शब्द बोलायाचे ॥ध्रु.॥ देखती जे डोळे । रूप आपुलें तें खेळे ॥२॥ तुका म्हणे नाद । झाला अवघा गोविंद ॥३॥