भजनी मालिका
← भजनांकडे परत

दाता लक्ष्मीचा पती । माझे मागणे ते किती

data lakshmicha pati | majhe magane te kiti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दाता लक्ष्मीचा पती । माझे मागणे ते किती ॥१॥ जाणे तान्हेल्याची तहान । पीता गंगा नव्हे न्यून ॥ध्रु॥ कल्पतरु झाला देता । तेथेपोटाचा मागता ॥२॥ तुका म्हणे संता ध्याता । परब्रह्मची आले हातां ॥३॥