भजनी मालिका
← भजनांकडे परत

दसरा दिवाळी तोचि आम्हां सन । सखे संतजन भेटतील

dasara divali tochi amhan san | sakhe santajan bhetatil

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दसरा दिवाळी तोचि आम्हां सन । सखे संतजन भेटतील ॥१॥ आमुप जोडल्या पुण्याचिया राशी । पार त्या सुखासी नाहि लेखा ॥ध्रु.॥ धन्य दिवस आजी झाला सोनियाचा । पिकली हे वाचा रामनामें ॥२॥ तुका म्हणे काय होऊं उतराई । जीव ठेवू पांयीं संतांचिये ॥३॥