भजनी मालिका
← भजनांकडे परत

दानें कांपे हात । नाव तेविशीं मात

danen kampe hat | nav tevishin mat

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दानें कांपे हात । नाव तेविशीं मात ॥१॥ कथी चावटीचे बोल । हिंग क्षीरीं मिथ्या फोल ॥ध्रु.॥ न वजती पाप । तीर्था म्हणे वेचूं काय ॥२॥ तुका म्हणे मनीं नाहीं । न ये आकारातें कांहीं ॥३॥