भजनी मालिका
← भजनांकडे परत

दंभें कीर्ती पोट भरे मानी जन । स्वहित कारण नव्हे कांहीं

dambhen kirti pot bhare mani jan | svahit karan navhe kanhin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दंभें कीर्ती पोट भरे मानी जन । स्वहित कारण नव्हे कांहीं ॥१॥ अंतरती तुझे पाय मज दुरी । धरितां हे थोरी जाणिवेची ॥ध्रु.॥ पिंडाच्या पाळणें धांवती विकार । मज दावेदार मजमाजी ॥२॥ कैसा करूं घात आपुला आपण । धरूनि गुमान लोकलाज ॥३॥ तुका म्हणे मज दावी तो सोहोळा । देखें पाय डोळां तुझे देवा ॥४॥