भजनी मालिका
← भजनांकडे परत

दहएांचिया अंगीं निघे ताक लोणी । एका मोलें दोन्ही मागों नये

dahaeanchiya angin nighe tak loni | eka molen donhi magon naye

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दहएांचिया अंगीं निघे ताक लोणी । एका मोलें दोन्ही मागों नये ॥१॥ आकाशाचे पोटीं चंद्र तारांगणें । दोहींशी समान पाहों नये ॥ध्रु.॥ पृथ्वीचा पोटीं हिरा गारगोटी । दोहोंसी समसाटी करूं नये ॥२॥ तुका म्हणे तैसे संत आणि जन । दोहींसी समान भजूं नये ॥३॥