भजनी मालिका
← भजनांकडे परत

चुकलिया आम्हां करितसां दंड । हाकासी कां खंड पांडुरंगा

chukaliya amhan karitasan dand | hakasi kan khand panduranga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चुकलिया आम्हां करितसां दंड । हाकासी कां खंड पांडुरंगा ॥१॥ चाळविलीं एकें रिद्धीसिद्धीवरी । तैसा मी भिकारी नव्हें देवा ॥ध्रु.॥ कां मी येथें गुंतों मांडूनि पसारा । मागुता दातारा दंभासाठी ॥२॥ केलें म्यां जतन आपुलें वचन । ठायींचें धरून होतों पोटीं ॥३॥ तुका म्हणे ताळा घातला आडाखीं । ठावें होतें सेकीं आडविसी ॥४॥