भजनी मालिका
← भजनांकडे परत

चुकली ते वाट । पुढें सांपडवी नीट

chukali te vat | pudhen sampadavi nit

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चुकली ते वाट । पुढें सांपडवी नीट ॥१॥ म्हणउनी गर्भवास । नेणती ते हरीचे दास ॥ध्रु.॥ संचिताचा संग । काय जाणों पावें भंग ॥२॥ तुका म्हणे दृष्टी । उघडितों नव्हे कष्टी ॥३॥