भजनी मालिका
← भजनांकडे परत

चोरटें काचे निघाले चोरी । आपलें तैसें पारखे घरीं

choraten kache nighale chori | apalen taisen parakhe gharin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चोरटें काचे निघाले चोरी । आपलें तैसें पारखे घरीं ॥१॥ नाहीं नफा नागवे आपण । गमाविले कान हात पाय ॥ध्रु.॥ बुद्धीहीन नये कांहीं चि कारणा । तयासवें जाणा तें चि सुख ॥२॥ तुका म्हणे नाहीं ठाउकें वर्म । तयासी ते कर्म वोढवलें ॥३॥