भजनी मालिका
← भजनांकडे परत

चोखियाचे घरी चोखियाची कांता

chokhiyache ghari chokhiyachi kanta

रचनाकार: संत बंका · अभंग
चोखियाचे घरी चोखियाची कांता । सोयरा तत्वतां नाम जीचें ॥१॥ बहु दिवस करी प्रपंच कारण । परी नव्हे संतान तिजलागीं ॥२॥ बैसोनियां एकांतीं आठवी पंढरीराणा । म्हणे कांवो नारायणा विसरलासी ॥३॥ आमुचीया कुळीं नाहीं वो संतान । तेणें वाटे शीण मना माझ्या ॥४॥ ऐकोनी पंढरीराव हासलासे मनीं । म्हणे ऐकें रुक्मिणी गोड एक ॥५॥ चोखियाची कांता चिंताक्रांत मनीं । संसारी असोनी उदास वृत्ती ॥६॥ पोटीं नाही मूल करी तळमळ । वंका म्हणे विठठल काय करी ॥७॥