भजनी मालिका
← भजनांकडे परत

चित्तीं नाहीं तें जवळीं असोनि काय । वत्स सांडी माय तेणें न्यायें

chittin nahin ten javalin asoni kay | vatsa sandi may tenen nyayen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चित्तीं नाहीं तें जवळीं असोनि काय । वत्स सांडी माय तेणें न्यायें ॥१॥ प्रीतीचा तो वायु गोड लागे मात । जरी जाय चित्त मिळोनियां ॥२॥ तुका म्हणे अवघें फिकें भावाविण । मीठ नाहीं अन्न तेणें न्यायें ॥३॥