भजनी मालिका
← भजनांकडे परत

चित्तीं धरीन मी पाउलें सकुमार । सकळ बिढार संपत्तीचें

chittin dharin mi paulen sakumar | sakal bidhar sampattichen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चित्तीं धरीन मी पाउलें सकुमार । सकळ बिढार संपत्तीचें ॥१॥ कंठीं धरिन मी नाम अमृताची वल्ली । होईल राहिली शीतळ तनु ॥ध्रु.॥ पाहेन श्रीमुख साजिरें सुंदर । सकळां अगर लावण्यांचें ॥२॥ करिन अंगसंग बाळकाचे परी । बैसेन तों वरी नुतरीं कडिये ॥३॥ तुका म्हणे हा केला तैसा होय । धरिली मनें सोय विठोबाची ॥४॥