भजनी मालिका
← भजनांकडे परत

चित्ताचें बांधलें जवळी तें वसे । प्रकाशीं प्रकाशे सर्वकाळ

chittachen bandhalen javali ten vase | prakashin prakashe sarvakal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चित्ताचें बांधलें जवळी तें वसे । प्रकाशीं प्रकाशे सर्वकाळ ॥१॥ अंतरीं वसावी उत्तम ते भेटी । होऊं कांहीं तुटी न सके चि ॥ध्रु.॥ ब्रम्हांड कवळे आठवणेसाटीं । धरावा तो पोटीं वाव बरा ॥२॥ तुका म्हणे लाभ घरिचिया घरीं । प्रेमतंतु दोरी न तुटता ॥३॥