भजनी मालिका
← भजनांकडे परत

चित्त घेऊनियां तू काय देसी । ऐसें मजपासीं सांग आधीं

chitta gheuniyan tu kay desi | aisen majapasin sang adhin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चित्त घेऊनियां तू काय देसी । ऐसें मजपासीं सांग आधीं ॥१॥ तरि च पंढरिराया करिन साटोवाटी । नेघें जया तुटी येईल तें ॥ध्रु.॥ रिद्धिसिद्धि कांहीं दाविसी अभिळास । नाहीं मज आस मुक्तीची ही ॥२॥ तुका म्हणे तुझें माझें घडे तर । भक्तीचा भाव रे देणें घेणें ॥३॥