भजनी मालिका
← भजनांकडे परत

चित्ता ऐसी नको देऊं आठवण । जेणें देवाचे चरण अंतरे तें

chitta aisi nako deun athavan | jenen devache charan antare ten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चित्ता ऐसी नको देऊं आठवण । जेणें देवाचे चरण अंतरे तें ॥१॥ आलिया वचन रामनामध्वनि । ऐकावीं कानीं ऐसीं गोडें ॥ध्रु.॥ मत्सराचा ठाव शरीरीं नसावा । लाभेंविण जीवा दुःख देतो ॥२॥ तुका म्हणे राहे अंतर शीतळ । शांतीचें तें बळ क्षमा अंगीं ॥३॥