भजनी मालिका
← भजनांकडे परत

चवदा भुवनें लोक तिन्हीं दाढे जो कवळी । संपुष्ट तो संबळीमध्यें देखा

chavada bhuvanen lok tinhin dadhe jo kavali | sampushta to sambalimadhyen dekha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चवदा भुवनें लोक तिन्हीं दाढे जो कवळी । संपुष्ट तो संबळीमध्यें देखा ॥१॥ उत्पित्तसंहारकरिता जो पाळण । तो नंदा नंदन म्हणवीतसे ॥ध्रु.॥ असुर तोडरी दैत्यांचा काळ । जाला द्वारपाळ बळीचा तो ॥२॥ लक्षुमीचा स्वामी क्षीराच्या सागरा । उच्छिष्टकवळा पसरी मुख ॥३॥ तुकयाबंधु म्हणे चतुरांचा रावो । भावें तो पाहा हो केला वेडा ॥४॥