भजनी मालिका
← भजनांकडे परत

चरणाचा महिमा । हा तो तुझ्या पुरुषोत्तमा

charanacha mahima | ha to tujhya purushottama

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चरणाचा महिमा । हा तो तुझ्या पुरुषोत्तमा ॥१॥ अंध पारखी माणिकें । बोलविशी स्पष्ट मुकें ॥ध्रु.॥ काय नाहीं सत्ता। हातीं तुझ्या पंढरीनाथा ॥२॥ तुका म्हणे मूढा । मज चेष्टविलें जडा ॥३॥