भजनी मालिका
← भजनांकडे परत

चरण मिरवले विटेवरी दोनी

charan miravale vitevari doni

रचनाकार: संत बंका · अभंग
चरण मिरवले विटेवरी दोनी । ध्यातसे ध्यानी सदाशिव ॥१॥ तो हा पंढरीराव कर दोनी कटीं । अभा असे तटीं भीवरेच्या ॥२॥ मुगुट कुंडले श्रीमुख शोभले । ध्यानी मिरवलें योगियांच्या ॥३॥ वंका म्हणे सर्व सिध्दिंचा दातार । भक्तां अभयकर देत असे ॥४॥