भजनी मालिका
← भजनांकडे परत

चांगला तरी पूर्णकाम । गोड तरी याचें चि नाम । दयाळ तरी अवघा धर्म । भला तरी दासा श्रम होऊं नेदी

changala tari purnakam | god tari yachen chi nam | dayal tari avagha dharma | bhala tari dasa shram houn nedi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चांगला तरी पूर्णकाम । गोड तरी याचें चि नाम । दयाळ तरी अवघा धर्म । भला तरी दासा श्रम होऊं नेदी ॥१॥ उदार तरी लक्ष्मीयेसी । जुंझार तरी कळिकाळासी । चतुर तरी गुणांची च रासी । जाणता तयासी तो एक ॥ध्रु.॥ जुनाट तरी बहु काळा । न कळे जयाची लीळा । नेणता गोवळीं गोवळा । लाघवी अबळाभुलवणा ॥२॥ गांढएा तरी भावाचा अंकित । बराडी तरी उच्छिष्टाची प्रीत । ओंगळ तरी कुब्जेशीं रीत । भ्याड अनंत बहु पापा ॥३॥ खेळतो येणें चि खेळावा । नट तो येणें चि आवगावा। लपोनि जीवीं न कळे जीवा । धरितां देवा नातुडेसी ॥४॥ उंच तरी बहुत चि उंच । नीच तरी बहुत चि नीच । तुका म्हणे बोलिलों साच। नाहीं अहाच पूजा केली ॥५॥