भजनी मालिका
← भजनांकडे परत

चंदनाचे संगे बोरीया बाभळी । हेकळी टाकळी चंदनाची

chandanache sange boriya babhali | hekali takali chandanachi

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
चंदनाचे संगे बोरीया बाभळी । हेकळी टाकळी चंदनाची ॥१॥ संतांचिया संगें अभाविक जन । तयाच्या दर्शनें तेची होती ॥२॥ चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा । नाहीं तरी भार वाहवा खरा ऐसा ॥३॥