भजनी मालिका
← भजनांकडे परत

चंदनाचे गांवीं सर्पांच्या वसति । भोगिते ते होती द्वीपांतरीं

chandanache ganvin sarpanchya vasati | bhogite te hoti dvipantarin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चंदनाचे गांवीं सर्पांच्या वसति । भोगिते ते होती द्वीपांतरीं ॥१॥ एका ओझें एका लाभ घडे देवा । संचिताचा ठेवा वेगळाला ॥ध्रु.॥ क्षीराची वसति अशुद्ध सेवावें । जवळी तें जावें भोगें दुरी ॥२॥ तुका म्हणे ऐसी बुद्धि ज्याची जड । त्याहुनि दगड बरे देवा ॥३॥