भजनी मालिका
← भजनांकडे परत

चळलें काय न करी बडबड । न म्हणे फिकें गोड भुकेलें तें

chalalen kay na kari badabad | na mhane phiken god bhukelen ten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चळलें काय न करी बडबड । न म्हणे फिकें गोड भुकेलें तें ॥१॥ उमजल्याविण न धरी सांभाळ । असो खळखळ जनाची हे ॥ध्रु.॥ गरज्या न कळे आपुलिया चाडा । करावी ते पीडा कोणा काई ॥२॥ तुका म्हणे भोग भोगितील भोगें । संचित तें जोगें आहे कोणा ॥३॥