भजनी मालिका
← भजनांकडे परत

चला वळूं गाई । बैसों जेऊं एके ठायीं

chala valun gai | baison jeun eke thayin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चला वळूं गाई । बैसों जेऊं एके ठायीं ॥१॥ बहु केली वणवण । पायपिटी जाला सिण ॥ध्रु.॥ खांदीं भार पोटीं भुक । काय खेळायाचें सुख ॥२॥ तुका म्हणे धांवे । मग अवघें बरवें ॥३॥