भजनी मालिका
← भजनांकडे परत

चला पंढरीसी जाऊं । रखुमादेवीवरा पाहूं

chala pandharisi jaun | rakhumadevivara pahun

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चला पंढरीसी जाऊं । रखुमादेवीवरा पाहूं ॥१॥ डोळे निवतील कान । मना तेथें समाधान ॥ध्रु.॥ संतां महंतां होतील भेटी । आनंदें नाचों वाळवंटीं ॥२॥ तें तीर्थांचे माहेर । सर्वसुखाचें भांडार ॥३॥ जन्म नाहीं रे आणीक । तुका म्हणे माझी भाक ॥४॥